
गोंदिया,-मुलाचे अपहरण करुन जीवाने मारण्याची भीती दाखवून 5 लाखाची खंडणी घेणार्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने नागपूर येथून अटक केली. प्रकाश हनसलाल टेंभरे (28), धम्मदिप मोहनलाल वासनिक (32), चंद्रशेखर मधुकर साठवणे (27) व गगन तेजराम भगत (24) सर्व रा.गोंदिया अशी आरोपींची नाव आहे.स्थानिक सेलटॅक्स वसाहतीमध्ये एका भाड्याच्या खोलीत गौरव संतोष बेदरे रा. भानेगाव, जिल्हा यांच्या लहान भाऊ व
त्याच्या चार मित्रांना राहत होते.5 नोव्हेंबर रोजी चार आरोपींनी गौरव बेंदरेच्या भाऊ व त्यांच्या मित्रांना बेदम मारहाण केली. तसेच गौरवच्या वडीलांना 5 लाख रुपयाची मागणी केली व पैसे न दिल्यास मुलाचे अपहरण करुन त्याला ठार मारण्याची धमकी फोनवरुन दिली. दरम्यान मुलाच्या जीवाच्या भीतीने त्याच्या वडीलांनी आरोपींना 5 लाख रुपये दिले. पैसे मिळताच आरोपी फरार झाले. याप्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 364(अ), 386,452, 342, 327, 323, भादंविअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे (youth kidnapped)शाखा पथक आरोपीचा शोध घेत असताना प्रकरणातील आरोपी हे नागपूर येथील कपिलनगर येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थागुशा पोलिसांनी चारही आरोपींना नागपूर येथून अटक केली.
चारही आरोपींनी गुन्हा केला असून त्यांना ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास पोनि अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक आसाराम चव्हाण हे करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या निर्देशान्वये अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने व स्थागुशाचे पोनि बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात पोउपनि विघ्ने, पोहवा. विठ्ठल ठाकरे, पोशि विजय मानकर, संतोष केदार, चापोशी मुरमुली पांडे व तांत्रिक सायबर शाखेचे सपोनि. महादेव शिद,पोहवा दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे यांनी केली.