breking विनयभंगप्रकरणी मुख्यलेखा वित्त अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

0
83

गडचिरोली-कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याला आपल्या कक्षात बोलावून विनयभंग करणाऱ्या गडचिरोली जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओमकार अंबपकर (५४, रा. कोल्हापूर) असे अटक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कर्मचारी ही गडचिरोली जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. आरोपी लेखा व वित्त अधिकारी ओमकार अंबपकर याने १६,१७ व १८ नोव्हेंबरला लागोपाठ तीन दिवस पीडित महिला कर्मचाऱ्याला कार्यालयीन कामाच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलावून नको त्या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. सततचा त्रास सहन न झाल्याने पीडितेने आरोपी लेखा व वित्त अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावरुनच अंबपकर याला अटक केली. त्याच्यावर विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.