40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या दोन तासात अटक

लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या दोन तासात अटक

0
38

blank

गोंदिया,दि.01- ” रेल्वे लाईन बांधकामाचे लोखंडी साहित्य चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या दोन तासात गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करुन चोरीच्या गुन्ह्यांतील लोखंडी साहित्य व बोलेरो वाहन असा एकूण किंमती- 5,13000 /- रू चा माल हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर धाडी टाकून अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे तसेच जिल्ह्यातील चोरी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करून चोरी घरफोडीच्या गुन्ह्यांवर प्रतिबंध करण्यासाठी निर्देशित करुन सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांचे निर्देश व आदेशान्वये , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, यांचे मार्गदर्शनात दिनांक 29/11/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे अवैध धंद्यावर रेड, व रात्र दरम्यान गुन्हेगार शोध, पेट्रोलिंग करीत असतांना एम.आय.ई. टी. कॉलेज कुडवा, समोरील स्मशानभूमी लगत असलेल्या झाडाखाली रात्री अंदाजे 02:00 वाजे दरम्यान महींद्रा बोलेरो पिक अप वाहन उभे असलेले दिसल्याने त्यावर संशय बळावल्याने सदर वाहणाजवळ जावुन गाडीची पाहणी केली असता ड्रायव्हर -संदिप शैलेश बावनथडे वय 20 वर्ष रा. कुडवा हा मिळून आला.
सदर वाहनाचे डाल्यामध्ये लोखंडी सेंट्रींगचे साहित्य सामान – जॅक पाईप चॅनल , चॅली , सेट्रींग प्लेट, लोखंडी डमरु इत्यादी सामाना बाबत विचारपुस केली असता सदरचे लोखंडी साहित्य सामान  मुनेश तिलकचंद नागपुरे रा. पगाटोला पांढराबोडी ता.जि. गोंदिया व  प्रज्वल अनिल मेश्राम रा. वार्ड क्र. ०३ कुडवा ता. जि. गोंदिया. व ईतर दोन विधीसंघर्ष बालके यांचे सोबत संगणमताने जुना कांबळे पेट्रोल पंप लक्ष्मण चौक भागवतटोला येथुन वाहण क्र. एम. एच.35 ऐ.जे.1458 ने जावुन रेल्वे लाईनचे बांधकामाकरीता ठेवलेले लोखंडी सामान बुलेरो पिकअप मध्ये भरुन चोरी केल्याचे कबूल केले.
पो.स्टे.रामनगर येथे फिर्यादी शमीर राजेंद्र लोहित रा. नागरा धाम ता.जि. गोंदिया यांचे फिर्यादि वरून अप क्र. 273 / 2022 कलम 379 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.जप्त लोखंडी साहित्य, किंमती 172000/- रू चे व वाहन असा एकूण किंमती 513000/- रू चा मुद्देमाल पो. स्टे. रामनगर यांना गुन्ह्याचे पुढील तपास संबंधाने आरोपी संदिप शैलेश बावनथडे रा. कुडवा,गोंदिया व  प्रज्वल अनिल मेश्राम रा. कुडवा, गोंदिया यांचेसह स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांचे निर्देश व आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड, यांचे मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात स्था.गु.शा. येथील पो उप. नि. विघ्ने यांचे पथक पो. शि. संतोष केदार 2086,पो. शि. विजय मानकर 2095 यांनी तत्परतेने केली आहे. पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी तत्परतेने केलेल्या कार्याचे कौतुक व अभिनंदन केले आहे

blank