
पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडे आहे तरी कोण?
पुणे :- पुण्यात विशेषतः कोथरूड परिसरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेला 2016 मध्ये अटक करण्यात आली होती.या कल्याणी देशपांडेला आता न्यायालयाने 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. कल्याणी देशपांडे यांच्यावर पंधराहून अधिक गुन्हे दाखल आहेत. कोथरूड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत वेश्याव्यवसाय चालवल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. 2005 ते 2015 या काळात कल्याणी देशपांडे हिने पुणे शहरात धुमाकूळ घातला होता. कोण आहे ही कल्याणी देशपांडे? वेश्या व्यवसायात तिने आपलं बस्तान कशाप्रकारे बसवलं होतं.. वेश्याव्यवसाय कायमचा बंद का होत नाही? वेश्याव्यवसाय कोण करू शकत या सर्व प्रश्नांची उत्तर देतायेत सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे. राजेंद्र भामरे पुणे पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी कल्याणी देशपांडेच्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला होता.