
गोंदिया,दि.18.जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस ठाणे परीसरातील मंगेझरी येथे रात्रीला नाकाबंदी दरम्यान 12.30 वाजेच्यासुमारास वाहनातून अवैधरित्या गोवंशजनावरांची वाहतूक होतांना आढळून आल्याने छापा कारवाई करीत 20 गोवंशसह 13 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे आदेशान्वये देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई 18 जानेवारीला केली.
या कार्रवाईमध्ये इमरान रियाज खान वय 27 वर्षे रा. चंगेरा ता.जि- गोंदिया व सहकारी मंगलेश मारबते रा. चंगेरा हा रात्रीचा व जंगलाचा फायदा घेवून पळून गेला.पळालेल्या इसमाचे ताब्यातील चारचाकी आयसर ट्रक वाहन क्र MH 36 F – 3533 वाहनामध्ये एकुण 20 बैल, गाय, गोरे अवैधरित्या, निर्दयतेने कोंबून व बांधुन अन्न पाण्याची कोणतीही सोय व व्यवस्था न करता वाहतुक करतांना नेत असताना पकडण्यात आले.पकडलेल्या वाहनाची किमंत 12,00,000/-रु. व 20 जनावरे (बैल, गाय, गोरे) किंमती 1,40,000 /- रू. असा एकुण 13, लाख 40 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच पकडलेल्या जनावरांना सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांची चारा पाण्याची व्यवस्था व्हावी या करीता सुकृत गौशाला कल्याणकारी संस्था, खैरी पो. पिंपळगाव ता. लाखनी जि. भंडारा येथे पाठवण्यात आले.सदर प्रकरणात आरोपी आरोपी इमरान रियाज खान वय 27 वर्षे रा. चंगेरा ता.जि- गोंदिया व फरार आरोपी- मंगलेश मारबते रा. चंगेरा ता.जि- गोंदिया यांच्या विरुध्द पोलीस ठाणे गंगाझरी येथे कलम 11(1) (ड) (ई) (ग) (फ) (ह) प्रा. नि. वा. का. 1960, सह कलम 5(अ), 2, 9 महा. पशु.सं.अधि. 1995 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.या विशेष पथकात पोलीस अंमलदार पो.हवा. सुजित हलमारे, पो.हवा. महेश मेहर, पो.ना. शैलेषकुमार निनावे, पो. शि. सन्नी चौरसिया, दया घरत, चा.पो.शि. हरिकृष्णा राव यांचा समावेश होता.