Home गुन्हेवार्ता अल्पवयीन मुलामुळे झालेल्या अपघातात इसमाचा मृत्यू,मोटारसायकल मालकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलामुळे झालेल्या अपघातात इसमाचा मृत्यू,मोटारसायकल मालकावर गुन्हा दाखल

0

गोंदिया,दि.11- अल्पवयीन असल्याची माहीती असुन सुध्दा वाहन चालविण्यास दिल्याने, अल्पवयीन मुलाद्वारे वाहन हयगयीने चालवून झालेल्या अपघातात पायदळ जाणार्या इसमाच्या मृत्यू झाल्याची घटना 10 मार्च रोजी रावणवाडी पोलीस ठाणे अंतर्गत घडली.यामुळे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास देक अपघात होण्यास कारणीभूत ठरल्याने वाहन मालकासह अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की,दिनांक १० मार्चच्या पहाटे ०५.३० वा दरम्यान रावणवाडी येथे मो. सा. क्र. एम. एच.३१ सी.वाय -२६७० चे मालकाने आपला मुलगा अल्पवयीन असल्याचे माहीती असुन सुध्दा मोटारसायकल १७ वर्षीय विधी संघर्ष बालकास चालविण्यास दिली. त्यामुळे वाहतूक नियम आणि कायदयाचे ज्ञान नसलेल्या अल्पवयीन बालकाने मोटार सायकल वाहन क्र.एम.एच. ३१ सी. वाय- २६७० हि अत्यंत भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी पायी  जात असलेल्या लिलेश्वर उदाराम लांजेवार(वय ४५,रा.घुमर्रा ता.गोरेगाव ह.मु.चारगांव ता.जि.गोंदिया) यांना जोरदार धडक दिल्याने त्यात गंभीर जखमी होवून मृत्यू पावले.सदर इसमाच्या मृत्यूस अल्पवयीन विधी संघर्ष बालक हा कारणीभूत झाल्याने व १७ वर्षीय विधीसंघर्ष बालकास मोटारसायकल चालविण्यास दिल्याने मोटारसायकल मालक (पालक) वर पोलीस ठाणे- रावणवाडी येथे अपराध क्रमांक ५९/२०२३ कलम २७९, ३३७, ३३८, ५०४, भादवि,सहकलम १८४, १३४ब, ३/१८२, ५/१८० मो. वा. का. अशाप्रकारे दाखल करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणातील

जिल्हयातील वाहन अपघाताचे प्रमाण कमी करण्या करीता गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे वेळोवेळी वाहतूक व्यवस्थे संबंधाने उपाय योजना करण्यात आलेल्या असून वाहतूकीचे नियम पाळण्या बाबत जनजागृती करण्यात येत असली तरी अशाप्रकार च्या अपघाताच्या घटना घडू नयेत याकरीता जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. जनतेने याबाबत स्वतः जागृत होवून आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यास देवू नये अन्यथा वाहन चालवावयास देणारे पालक अथवा वाहन मालक यांचेवर कडक कारवाई करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात येईल असे आवाहन गोंदिया पोलीस दलातर्फे करण्यात येत असून वाहतुकीचे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे

error: Content is protected !!
Exit mobile version