Home गुन्हेवार्ता अवैध गौण खनिज चोरी करणार्‍या दोघांना ट्रॅक्टरसह पकडले

अवैध गौण खनिज चोरी करणार्‍या दोघांना ट्रॅक्टरसह पकडले

0

-12 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया,दि.25 :स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावणवाडी पोलीस ठाणे अंतर्गत किन्ही दासगाव मार्गावर अवैद्यरित्या गौण खनिजाची वाहतूक करणार्या ट्रक्टरसह दोघांना ताब्यात घेतले असून 12 लाख 3 हजाराचा मुद्देमालही जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांचे निर्देशाप्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली 25/03/2023 रोजी रात्री 01.35 वाजता दरम्यान किन्ही घाट येथील वैनगंगा नदी पात्रातुन किन्ही गावाकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून छापा कारवाई केली असता अवैधरित्या गौण खनिज रेतीची चोरी करणाऱ्या दोघांना ट्रॅक्टरसह पकडण्यात आले.
सदर प्रकरणी ट्रॅक्टर चालक – मालक अमितसिंग नरेश सिंग जतपेले वय 27 वर्षे रा. किन्ही , तालुका जिल्हा- गोंदिया ट्रॅक्टर क्र. MH- 35 AR – 1545 चा (चालक – मालक,), संजय परदेशी कहानवत वय 37 रा. किन्ही तालुका जिल्हा- गोंदिया ट्रॅक्टर क्र. MH- 35 AR- 3089 चा (चालक – मालक,) याचेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 379, अन्वये गुन्हा नोंदविण्या त आलेला असुन त्यांचे ताब्यातून एक निळ्या रंगाचे स्वराज कंपनी चे ट्रॅक्टर क्र .MH 35 AR 1545 व 1/2 ब्रास रेती, एक निळ्या रंगाचे पॉवर ट्रॅक कंपनीचे ट्रॅक्टर क्र .MH 35 AR 3089 व 1/2 ब्रास रेती असा एकूण 12 लाख 3000 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई रावणवाडी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शना खाली स्था. गु. शा. चे पो. नि.दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात स्था. गु. शा. येथील पथक मपोउपनि.वनिता सायकर,पोहवा.भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, रियाज शेख, पोशि संतोष केदार, मपोशि स्मिता तोंडरे, यांनी केलेली आहे.

Exit mobile version