जुन्या वादातून भुराटोला येथे युुवकाची हत्या

0
15

तिरोडा,दि.19- तालुक्यातील भुराटोला येथे गुरुदास माणिकचंद रहांगडाले (वय २८) याची जुन्या वैमानस्यातून निर्घ्रुण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.मिळालेली माहिती अशी,शेतात जनावरे चारण्याच्या जुने वादावरून चंद्रकुमार तुमळे व दोन मुलानी मिळून युवकाची हत्या केल्याची घटना १८ तारखेचे रात्री घडली.तिरोडा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे.मृतकाचा गावातीलच आरोपी यांचे शेतात मागील वर्षी जनावरे चारण्यास नेल्याने झालेले नुकसानीवरून वाद सुरू होता.त्यावरून १८ तारखेचे रात्री साडे नऊ वाजताचे दरम्यान सदर युवक खर्रा घेण्यास गेला असता तुमडे तीन बाप लेकांनी मिळून या युवकास पकडून चाकूने वार करून गंभीर जखमी केले.नातेवाईकांनी त्यास उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे उपचाराकरीता नेले असता प्राथमिक उपचार करून गोंदिया येथे
पुढील उपचाराकरीता पाठविण्यात आले.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम 302,34 अन्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.