
अर्जुनी मोर-अर्जुनी मोर तालुक्यातील वडेगाव स्टेशन सहवन क्षेत्रात घोरपडीचे शिकार करून मासा सहित आरोपीला पकडून आरोपी नामक कार्तिक ज्ञानीराम मडावी राहणार बुधेवाडा यास दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत वन कोठडी दिलेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सहा ऑगस्टला गुप्त माहितीच्या आधारे वडेगाव सहवान क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक दिनेश बोरकर यांनी आरोपी कार्तिक ग्यानीराम मडावी मुक्काम बुदेवाडा यास वन्यप्राणी घोरपडीचे अंदाजे दीड किलो मासा सहित बुधवाडा रोडवर रंगेहात पकडले. त्यानंतर आरोपीस पुढील चौकशी करिता ताब्यात घेऊन आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.सात ऑगस्ट रोजी आरोपी कार्तिक यांचे बयान नोंदविण्यात येऊन आरोपीने इतर दोन साथीदारांसह सरकारी जंगल कक्ष क्रमांक 11 68 संरक्षित वन बीट वडेगाव येथून कुत्र्याचे सहाय्याने दोन घोरपडी शिकार करून त्यांच्या मासाचे तुकडे खाण्याकरिता नेत असल्याचे आरोपीने कबूल केले. त्या अनुषंगाने आरोपी नामे कार्तिक मडावी यांचे विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48 ये 49 बी 50 ,51 नुसार गुन्हा नोंद करून आरोपीस माननीय प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अर्जुनी मोर यांचे समक्ष हजर करण्यात आले. न्यायालयाने दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत आरोपीस वन कोठडी सुनावलेली आहे.