गोंदिया- फिर्यादी अजय महेन्द्र गजभिये रा. गौतमबुद्ध वार्ड, कुंभारे नगर, गोदिया, यांचे कुंभारे नगर गोंदिया येथील वॉटर प्लान्ट येथे येवुन प्लान्ट मधील ताराच्या कम्पॉन्डचे आत स्वतःच्या मालकीची दोन्ही टाटा एस चार चाकी वाहन उभे करुन ठेवले व सकाळी वाहन ठेवलेल्या जागेवर जावुन वाहनाचे कॅबीन उघडले असता दोन्ही वाहनाचे कॅबीन मध्ये बसवलेल्या प्रत्येकी एक नग एक्साइट कंपनीची बॅटरी प्रत्येकी किंमत अंदाजे 5000 /- रुपये प्रमाणे अश्या दोन नग बॅटऱ्या एकुण किंमती 10,000 /- रुपयाची कुणीतरी अज्ञात चोराने चोरुन नेल्याचे फिर्यादीचे रिपोर्टवरून पो. ठाणे गोंदिया शहर येथे अपराध क्रं.533 /2023 कलम 379 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांनी सर्व ठाणेदार, गोंदिया जिल्हा यांना निर्देशित करून तपास सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहर चे पो. नि. चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्हाचे तपासात गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत इसम नामे – भूषण विदेश साखरे, वय 23 वर्षे, रा.सावित्रीबाई फुले वार्ड, कुंभारे नगर, गोंदिया यास ताब्यात घेवुन त्यास चोरी गेलेल्या बॅटरी बाबत विश्वासात घेवून विचारना केली असता त्याने सुरवातीस उडवा उडवीचे उत्तरे देवुन बॅटरी चोरी केल्याचे कबुल केले. त्याच्या ताब्यातून चोरीतील दोन नग एक्साईट कंपनीची लाल रंगाची बॅटऱ्या एकुण किंमती 10,000/- रूपयाची जप्त करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास मपोहवा. रिना चौव्हाण, पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, अशोक बनकर, अप्पर पोलीस अधिक्षक, सुनिल ताजने, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स. पो. नि. सागर पाटील, पो.हवा. कवलपाल भाटीया, जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, मपोहवा. रिना चौव्हाण, पो. शि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, अशोक रहांगडाले, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केली.