37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या करून पतीची आत्महत्या

पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या करून पतीची आत्महत्या

0
23

blank

बुलढाणा : चिखली येथे पोलिस महिला कर्मचारी असलेल्या पत्नी आणि मुलीची चाकूने हत्या करून पतीने नंतर आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे नागपंचमीला जिल्हा हादरला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज सोमवारी खुनी थरार घडला. खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ एका घरात हा घटनाक्रम घडला.किशोर जनार्दन कुटे असे आरोपी पती(पित्याचे) नाव आहे. त्याने महिला पोलिस कर्मचारी असलेल्या पत्नी वर्षा दंदाले चाकूने सपासप वार करून हत्या केली. या पाठोपाठ कांदा कापण्याच्या चाकूने दीड वर्षाच्या मुलीचीही हत्या केली. दोघांची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी किशोर याने घटनास्थळावरून पळ गाठला. यानंतर थेट अंढेरा परिसरात येवून त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. दरम्यान, चिखली पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.

blank