नागपूर : हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी करीत असलेल्या दोघांना ५.४ कोटी रुपये किमतीच्या सुमारे नऊ किलो सोन्यासह अटक करण्यात आली. १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस १२ ऑक्टोबर रोजी हावडा येथून निघताच, नागपूर रेल्वे सुक्षा दलास रेल्वे मार्गावर सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. आठ आरपीएफ जवानांचे विशेष पथक तयार करण्यात आले. ही गाडी नागपुरात फलाट क्रमांक ८ वर येताच गुप्त माहितीच्या आधारे तस्करांचा शोध घेण्यात आला.
राहुल (३६) आणि बाळूराम (४१) नावाचे दोघेही नागपूरचे असून ते एस-४ मध्ये आसन क्रमांक २४ आणि २८ वर बसले होते. त्यांच्याकडील दोन बॅगमध्ये अंदाजे ८.५ ते नऊ किलो सोन्याची बिस्किटे होती. त्यांना अटक करण्यात आली. जप्त केलेला सोने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले असून जप्त केलेल्या सोन्याची बाजारातील किंमत अंदाजे ५.४ कोटी रुपये आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.