अडीच हजाराची लाच घेतांना सडक अर्जुनीचा तलाठी ताब्यात

0
24

गोंदिया,दि.19- सडक अर्जुनी तालुक्यातील नैनपूर डुग्गीपार येथील तक्रारदाराच्या शेताचे बक्षीसपत्राचे फेरफार करुन देण्याकरीता 3 हजाराची लाच मागणार्या सडक अर्जुनीच्या तलाठ्यास तडजोडीअंती 2500 हजाराची लाच घेतांना आज दि.19 आँक्टोंबरला लाचलूचपत विभागाने ताब्यात घेतले.आरोपी लोकसेवक तलाठी सुरेन मुन्ना मारगाये (वय ३८,पद तलाठी त.सा.क्र १७, ता सडक अजुनी, रा. मोरगाव अजुनी जिल्हा गोंदिया) असे आहे.आरोपी तलाठीविरुध्द डुग्गीपार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सविस्तर असे की, तक्रारदार हे शेतकरी असून तक्रारदार यांचे वडीलांनी त्यांचे नावे नैनपुर शिवारात असलेली सर्वे क्रं 332 व 333 मधील 0. 34 व 0.54 हे. आर शेती तक्रारदार व त्यांची वहीनी यांच्या नावे बक्षीस पत्र करून दिली असून सदर बक्षीस पत्राची दुय्यम निबंधक सडक अजुनी यांच्या कार्यालयात दि. 26/9/23 रोजी नोंदणी केले आहे.
तक्रारदाराने सदर बक्षीसपत्राची नोंदणी प्रत व फेरफाराबाबतचा अर्ज 03/10/23 रोजी तलाठी यांच्या कार्यालयात देउन फेरफार करून देण्याची विनंती केली असता आलोसे यांनी 3000/- रू लाचेची मागणी केली.

तक्रारादारांच्या वडिलांचे नावे असलेली जमीन तक्रारदार व त्यांची वहीनी यांचे नावाने फेरफार करुण देने करीता आलोसे रु 3000/- लाच रकमेची पंचा समक्ष मागणी करुण तडजोडीअन्ती रु 2500/- लाचेची मागणी करुण आलोसे यांनी पंचासमक्ष लाच स्वीकारली. यातील आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वता:च्या लाभाकरीता गैर वाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला.आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही कारवाई राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक,संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक,अनामिका मिर्झापूरे, वाचक पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. गोंदिया मो. क्रं 9867112185 ,सापळा अधिकारी पोलीस उप अधीक्षक विलास काळे यांच्या नेतृत्वात पोनी अतुल तवाड़े, पो. नि. उमाकांत उगले.स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे,पो. हवा. संजयकुमार बोहरे,मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे,नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, मनापोशी संगीता पटले ,रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांनी केली.

*गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी संपर्क साधावा.
*1) मा.श्री.राहुल माकणीकर सर, पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर.मो.नं.9923252100.
2) विलास काळे
पोलीस उप अधीक्षक,
ला. प्र.वि .गोंदिया *
*मो. नं.9867112185
अतुल तवाडे पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. गोंदिया
मो. क्र.9370997485
पो. नि. उमाकांत उगले
9664959090
* ला. प्र. वि. गोंदिया
दुरध्वनी 07182251203 *
@ टोल फ्रि क्रं. 1064**