धनादेश अनादर प्रकरणी तीन महिन्याचा कारावास

0
7

१ लाख ७० हजार रूपयाचा दंड
न्यायालयाचा निर्वाळा
गोंदिया : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला तीन महिने कारावास व १ लाख ७० हजार रूपयाचा दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी एस.डी.वाघमारे यांनी १८ ऑक्टोबर रोजी हा निर्वाळा दिला. प्रमोद लक्ष्मण वालके रा.खमारी ता.तिरोडा असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, तिरोडा तालुक्यातील खमारी येथील प्रमोद लक्ष्मण वालके यांनी श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि.शाखा गोंदिया येथून कर्ज घेतले होते. परंतु, वेळेवर कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी कर्जाचे हप्ते थकल्याने कंपनीसोबत करार करून आरोपीने कंपनीला एक लाख ३५ हजार ३६२ रूपयाचा धनादेश दिला. श्रीराम फायनान्स कंपनीच्या वतीने हा धनादेश वटविण्यासाठी बँकेत जमा करण्यात आला. मात्र आरोपीच्या खात्यात रक्कम नसल्याने तो धनादेश वटला नाही. परिणामी फसवणूक होवून धनादेशाचा अनादर झाला. या अनुसंगाने श्रीराम फायनान्स कंपनीने न्यायालयात हे प्रकरण दाखल केले. न्यायालयाने दोन्ही पक्षाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर या प्रकरणी आरोपीला दोषी धरले. १८ ऑक्टोबर रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी वाघमारे यांनी धनादेश अनादर प्रकरणी आरोपी प्रमोद वालके याला तीन महिने कारावास व १ लाख ७० हजार रूपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावली. श्रीराम कंपनीच्या वतीने अ‍ॅड.रूपेंद्र कटरे तर विधी अधिकारी म्हणून वोसवेल प्रâांसीस जोसेफ यांनी काम पाहिले.
००००००