व्यवसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

0
9

अमरावती दि 20-शहरातील एका व्यवसायाने स्वतःच्या छातीवर बंदुकीची गोळी झाडूनआत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरातील व्यावसायिक व सर्वसामान्यांमध्ये चांगलीच खडबड उडाली आहे.

ही घटना शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या महेश नगर परिसरात घडली. अशोक शर्मा असे आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांचे शहरात मिठाईचे दुकान आहे. सायंकाळी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य मंदिरामध्ये दर्शनाकरता गेले होते. यावेळी त्यांनी अशोक शर्मा यांना देखील सोबत येण्यास सांगितले. परंतु अशोक शर्मा घरीच थांबले. यानंतर काही वेळातच त्यांनी स्वतःच्या पिस्तूलने छातीवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी झाडल्याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिक त्यांच्या घरी पोहोचले. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे शहरातील व्यावसायिक व सर्वसामान्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.