विनोद सुरसावंत/ककोडी दि० २२– चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ककोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेली अंगणवाडी केन्द्र क्रं १ मध्ये अज्ञात चोरानी ताला तोडुन आगणवाडीतील 32 इंच LED Tv, संच आणि सोलर बाँटरी साहित्य चोरुन नेल्याची घटना सोमवारला सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.सोमवारला सकाळच्या सुमारास अंगणवाडी सुरु करण्यासाठी मदतनीस माधुरीबाई चनाप या गेल्या असता दरवाज्याचा कुलूप तुटलेला असल्याचे लक्षात आले.लगेच अंगणवाडी शिक्षिका रवीता राऊत ला कुलुप तुटले असल्याची माहिती दिली.त्यानंतर अंगणवाडी केंद्राची चौकशी केल्यावर TV आणि सोलरची बाँटरी चोरी झाल्याचे दिसून आल्याने अंगणवाडी शिक्षिकेच्या तक्रारीवरुन चिचगड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंंदवण्यात आला आहे.