35.7 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता मुरकुटी येथे नक्षल समर्थकाची हत्या

मुरकुटी येथे नक्षल समर्थकाची हत्या

0
22

blank

गडचिरोली,दि.०३– पोलीस स्टेशन कोरचीपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरकुटी येथे एका नागरिकाची हत्या झाल्याची नोंद झाली आहे. गडचिरोली गोंदिया सीमेवर नामे चमरा मडावी, रा. मुरकुटी यांचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. मृतक हा कट्टर नक्षल समर्थक होता, मृताची बहीण एमएमसी परिसरातील विस्तार प्लाटून 3 ची माओवादी सदस्य असून डीव्हीसीएमची पत्नी आहे.

त्याच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या पॅम्फ्लेटमध्ये म्हटले आहे की तो आधी नक्षलवाद्यांसाठी काम करत होता पण नंतर तो अनेक कंत्राटदारांकडून नक्षलवाद्यांच्या नावावर पैसे गोळा करत होता. त्याला पोलीस खबरदार म्हणूनही ओळखले गेले आहे.

नक्षलवाद्यांना राऊंड पुरवण्याच्या प्रयत्नात त्याला गेल्या वर्षी मध्य प्रदेशात बालाघाट येथे अटक करण्यात आली होती आणि काही महिन्यांपूर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. या खुनाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.

blank