
गोंदिया, दि.9 : 11 ऑगस्ट 2023 रोजी रेल्वे स्टेशन गोंदिया प्लॅटफार्म नं.4 चे हावडा एन्डकडे पुरुष महिला मुतारी जवळ एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 45 वर्ष हा मरण पावल्याने स्टेशन प्रबंधक रेल्वे स्टेशन गोंदिया व रेल्वे डॉक्टर यांचे मेमोवरुन रेल्वे पोलीस स्टेशन गोंदिया येथे अ.मृ.नं. 32/2023 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे मर्ग दाखल करण्यात आला आहे.
मयत पुरुषाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. वय- अंदाजे 45 वर्ष, उंची- 5 फुट 5 इंच, चेहरा- लांबट, बांधा- साधारण मजबुत, डोक्याचे केस- पांढरे/काळे, गोंदलेले- छातीवर इंग्रजीत KIRTI, कपडे- अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा फुल बाहिचा शर्ट तसेच कमरेला काळपट रंगाचा हॉप लोवर. अशाप्रकारचे वर्णन असलेले मयत पुरुष जर कोणाचे नातेवाईक असेल तर रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथे येवून ओळख पटवून घ्यावी. असे आवाहन राजेशसिंग ठाकुर, तपास अधिकारी, रेल्वे पोलीस स्टेशन, गोंदिया यांनी केले आहे.