एकाचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर; समृद्धी महामार्गावरील घटना

0
4

बुलढाणा : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला उलटून त्याला अचानक आग लागल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर झाले. आज शनिवारी मेहकर ‘इंटरचेंज’ जवळील चायगाव नजीकच्या मुंबई कॉरिडोर मधील चॅनेल नंबर २९० जवळ ही भीषण दुर्घटना घडली. अपघातग्रस्त ‘ट्रक’ समृद्धी महामार्गाने नागपुरवरुन मुंबईकडे जात होता. दरम्यान चालकाला डुलकी लागल्यामुळे भरधाव ट्रक चैनल नंम्बर २९० जवळ महामार्गाच्या कठड्याला तोडून रस्त्याच्या खाली उलटला. वाहनाने लगेच पेट घेतला. यावेळी ट्रक मध्ये तीन जण अडकले होते.अपघाताची माहिती मिळताच समृद्धी वरील जलद कृती दल, रुग्णवाहिका, अग्निशमन दल ॲम्बुलन्स अग्निशामक दलाचे वाहन, पोलीस त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी आग विझवून आतमध्ये अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढले. वाहनातील एजाज शाह वय (२० वर्ष, रा. उत्तर प्रदेश) यांचा गंभीररित्या जळाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. शकील शाह (वय ३५ ) व शोएब अली (वय १५) हे दोघे जण आगीने भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेहकर मधील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, मेहकर येथे पाठविण्यात आला आहे . डॉ. अशोक पिसे , प्रदीप पडघान , भगवान राठोड़ तसेच समृद्धी महामार्ग पोलिस व जलद कृती दलाने तात्काळ अपघातस्थळी पोहोचत मदत केली.