…बलात्कार करणाऱ्या नराधमास त्याच्या मृत्यूपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा

0
25

वृध्द असहाय्य विधवा महिलेवर जबरीने शारीरिक अतिप्रसंग… …..

गोंदिया,दि.14- जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाणेअंतर्गत घडलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशां एन. बी. लवटेनी 65 वर्षाच्या असहाय्य विधवेवर जबरीने बलात्कार करणाऱ्या नराधमास त्याच्या मृत्यूपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा आज 14 मार्च रोजी सुनावली.

सविस्तर असे की,5 डिसेंबर 2022 चे दुपारी पीडित 65 वर्षीय वृध्द महिला ही नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्याकरिता शेतशिवारात गेली असता गुन्ह्यातील नराधम आरोपी नामे- राहुल ठाकरे वय 24 वर्षे याने वेळ दुपारी 12.30 वाजता ते 16.00 वाजता दरम्यान पीडित वृध्द महिला/ फिर्यादीच्या मागून येऊन तिचे तोंड दाबुन, ओरडू नको नाहीतर तुला जीवाने मारून टाकीन असे बोलून पिडीत महिलेला दुसऱ्या बांधीत नेऊन तिचे इच्छेविरुद्ध जबरीने तिचेवर शारीरिक अतिप्रसंग करून, त्यानंतर पुन्हा अर्धा तासाने विधवेच्या तोंडामध्ये अनैसर्गिक कृत्य करून छातीवर चावा घेवून व त्यानंतर ओरडू नकोस म्हणून पुन्हा अर्धा तासाने पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरीने संभोग करून पिडीत— असहाय्य महिलेला जाण्यास मज्जाव- प्रतिबंध केला…. असे पिडीत वृध्द महिलेच्या तक्रार /बयाणा वरून पोलीस ठाणे- दवणीवाडा येथे अपराध क्रमांक- 298/2022 कलम 376 (2),(M),(N), 341, 324, 506 भा.दं. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले होते.

एका असहाय्य वृद्ध महिलेवर एका तरुण नराधमाने केलेल्या शारीरिक अत्यंत घृणास्पद कृत्याची दखल घेत मा. वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा तपास तातडीने व अत्यंत बारकाईने सखोल परिस्थितीजन्य, आणि भौतिक दुवे तपासून पुरव्यानिशी रीतसर करण्याच्या निर्देश सूचना दिलेल्या होत्या.

मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयातील आरोपी नामे- राहुल ठाकरे वय 24 वर्षे यास गुन्ह्यांत तातडीने अटक करण्यात आली आणि सदर गुन्ह्याचा रितसर तपास करण्यात आला.गुन्ह्यात सबळ साक्षपुरावे, भौतिक दुवे, परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून तपासाअंती आरोपीतांविरुध्द गुन्हा निष्पन्न झाल्याने मा. न्यायालयात गुन्ह्याचे दोषारोपपत्र तयार करुन दाखल करण्यात आले होते.न्यायालयाकडुन सदर गुन्ह्याचे केस क्रमांक – 20/2023 अन्वये खटला चालविण्यात आला.सदर गुन्ह्याच्या खटल्यामध्ये तदर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश, न्यायालय गोंदिया एन. बी. लवटे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी राहुल ठाकरे वय 24 वर्षे यास सदर गुन्ह्यांत खालील प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.

1) कलम – 376 (2) भा.द.वि. मध्ये मृत्यूपर्यंत आजन्म कारावास व 50,000/- रू, दंड, दंड न भरल्यास 6 महिन्याचा अधिकचा कारावास.

2) कलम 324 भा.द.वि.- मध्ये 1 वर्षाचा कारावास व 1,000/- रु दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याचा अधिकचा कारावास.

3) कलम 341 भा.द.वि.- मध्ये 1 महिण्याचा कारावास व 500/-रु दंड , दंड न भरल्यास 7 दिवन अधिकचा कारावास

4) कलम 506 भा.द.वि.- मध्ये 2 वर्षाचा कारावास व 1,000 रु दंड, दंड न भरख्यास 15 दिवस अधिकचा कारावास. याप्रमाणे न्यायालयाने नराधम आरोपीस शिक्षा ठोठावली आहे.

सदर गुन्ह्याचा उत्कृष्ठ तपास स.पो.नि. राहुल पाटील, यांनी केले असून सदर गुन्ह्याचे तपास कार्यात पोलीस अंमलदार पो.हवा. धनेश्वर पिपरेवार, पो.ना. टेंभेकर, मपोशि. मस्करे, यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर खटल्याचे कोर्ट पैरवी म्हणून न्यायालयीन कामकाज आकाश मेश्राम यांनी पाहिले.

सदर खटल्याचा न्यायालयीन पुरावा सुरू झाल्यापासून 3 महिन्यांत सदरचे प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. पुराव्याच्या सुरुवातीपासून प्रकरणाचा जलद निपटारा करण्यात आला आहे,हे यात विशेष.सदर खटल्याचे संपुर्ण न्यायालयीन प्रकरणाचे प्रतिनिधित्व गोंदिया जिल्ह्याचे सहायक संचालक आणि सरकारी वकील सतीश यू. घोडे यांनी न्यायालयात उत्तमरित्या सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा प्रमोद मडामे, दवनिवाडा पोलीस निरीक्षक सतिश जाधव यांनी पीडित महीलेला न्याय मिळवून देण्याकरिता उत्कृष्टरित्या तपास कार्य करणारे अधिकारी, तपास कार्यात मदत करणारे सहभागी आणि न्यायालयीन प्रक्रियेत मदत करणारे पोलीस अंमलदार, सहायक संचालक आणि सरकारी अभियोक्ता सतिश यु. घोडे, यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.