Home गुन्हेवार्ता एका घरात सापडली काडतूस व पिस्तूल; आरोपी फरार

एका घरात सापडली काडतूस व पिस्तूल; आरोपी फरार

0

गोंदिया(Gondia):- जिल्ह्यातील गुन्हे प्रवृत्ती लोकांच्या मुसक्या आवळण्यासाठी गोंदिया पोलिसांनी अकॅशन प्लॅन आखून कारवाई ची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत काल गोंदिया शहरातील सावरटोली येथील महानंदे यांच्या घराची झाडाझडती घेतली असता लाकडी दिवाण मध्ये काडतुस व पिस्तूल सापडली. विनापरवाना शस्त्र बाळगल्या (Unlicensed possession of weapons) प्रकरणी दोन भावंडांपैकी एकास अटक करण्यात आली. सुमित विनोद महानंदे (32), असे अटकेतील व भुपेंद्र विनोद महानंदे (28) असे फरार आरोपींची नावे आहेत.

आरोपी दोन भावंडांपैकी एकास अटक; एक फरार

आगामी सण-उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्ह्यांत अवैध कृती करणारे, जनसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसावा याकरिता अवैधरित्या शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई करणाचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले आहेत. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीच्या आधारे सुमित महानंदे, रा. सावराटोली, गोंदिया यांचे राहते घराची झडती घेतली.

गोंदिया पोलिसांची कारवाई

दरम्यान बेडरुम मधील लाकडी दिवानमध्ये एक लोखंडी पिस्टल मॅगझिनसह. किंमती 25,000/-रु चे अग्निशस्त्र अवैधरित्या मिळुन आल्याने जप्त करण्यात आले आहे. यामुळे अवैधरित्या पिस्तुल, बाळगल्याप्रकरणी भुपेंद्र विनोद महानंदे, वय 28 वर्षे, रा. सावराटोली, बजाज बार्ड, गोंदिया ला अटक करण्यात आली. दुसरा आरोपी सुमित विनोद महानंदे (32) हा पोलिसांच्या हाती लागला नाही. दोन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस (Gondia City Police)ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, सह कलम 135 म. पो. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कायदेशीर कारवाई गोंदिया शहर पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, मपोउपनि वनिता सायकर, पोहवा. राजु मिश्रा, महेश मेहर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांनी केली आहे..

Exit mobile version