गोरेगाव, दि. 01 एप्रिल : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे आयोजित बागेश्वर महाराज प्रवचना कार्यक्रमात बाबा बागेश्वर यांनी बाबा जुमदेव यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात भंडारा गोंदिया जिल्ह्यात जुमदेवबाबांच्या अनुयांयांनी निषेध नोंदवित पोलिसात तक्रारी दाखल केल्या होत्या.त्यातच 31 मार्च रोजी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे जुमदेवबाबाच्या समर्थकांनी भव्य मोर्चा काढून बागेश्वरचा निषेध नोंदवला.
तर आज 01 एप्रिल रोजी गोरेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम कटंगी येथील एका व्हाट्सअप ग्रुपवर 2 तरुणांनी बाबा जुमदेव यांच्या विरोधात पोस्ट केल्याने परमात्मा एक सेवकांनी आक्रोश व्यक्त करीत परमात्मा एक सेवकांनी गोरेगाव पोलीस स्टेशन येथे एकत्रित येत समाजमाध्यमावर अवमानजनक पोस्ट प्रसारित करणार्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी रेटून धरली.त्यानंतर याप्रकरणी कटंगी बु.निवासी नितेश डोंबळे व गौरव हरिनखेडे या दोन्ही युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५०५ (२) कलमन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असुन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारे सोशल मीडियावर कुणी पोस्ट करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांनी केले आहे.