विदेशी बनावटी पिस्तुल बाळगणाऱ्यास पिस्तुल व 5 जिवंत काडतूसासह अटक

0
50

गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करीत श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड येथील विक्रांत उर्फ मोनु गौतम बोरकर यास विदेशी बनावटीची पिस्तुल, मॅगझिन व 5 जिवंत काडतूसासह जेरबंद केले.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या निर्देश मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 10 मे 2024 रोजी गुप्त मिळालेल्या माहितीनुसार श्रीनगरातील चंद्रशेखर वॉर्ड येथील इसमांकडे अग्निशस्त्र असून तो त्याची विल्हेवाट लावणार असल्याची माहिती मिळाली.त्या माहितीची सत्यता पडताळून कारवाई केली असता, विक्रांत उर्फ मोनु गौतम बोरकर वय 2,राहणार श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड, गोंदिया याच्या राहते घरी विदेशी बनावटीची पिस्तूल, मॅगझिन, आणि 5 जिवंत काडतुसासह अवैधरित्या प्रतिबंधित अग्निशस्त्र मिळाल्यानेे त्यास ताब्यात घेण्यात आले.पिस्तूल बाळगण्याबाबत विचारणा, चौकशी केली असता त्याने समर्पक असे कोणतेच उत्तर न दिल्याने त्याचेविरूध्द पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, सहकलंम 135 मपोका अन्वये अप.क्र.296/2024 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.गुन्हेगार आरोपी यास जप्त पिस्तुल मुद्देमालसह गोंदिया शहर पोलीसांचे स्वाधीन करुन अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे निर्देशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे स. पो. नि. विजय शिंदे, पो. उप. नि. महेश विघ्ने, म.पो.उप.नि. वनिता सायकर, पो.हवा.राजु मिश्रा, महेश मेहर, चित्तरंजन कोडापे, तुलसी लुटे, नेवालाल भेलावे, इंद्रजित विसेन, रियाज शेख, पो. शि. संतोष केदार, यांनी कारवाई केलेली आहे.