महेश दखणे हत्याकांडाली चार आरोपी जेरबंद

0
34

गोंदिया,दि.११- चाकीने जाणार्‍या एका  प्रॉपर्टी डीलरवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना रविवार 9 जून रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास शहरातील छोटो गोंदियातील किसान चौक येथे घडली.घटनेत गंभीर जखमी झालेल्या महेश दखने (36, रा. छोटा गोंदिया यांचा काल रात्रीत्र 9.30 वाजताच्या सुमारास शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. घटनेनंतर पोलसांनी तपासाची सुत्रे हलवून मुख्य आरोपीसह इतर तिन आरोपींना रविवारीच रात्री 11.30 च्या सुमारास बेड्या ठोकल्या. देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे (48) रा. आंबाटोली, गोंदिया असे मुख्य आरोपीचे तर सुरेंद्र हरिदास मटाले (32) रा. शिवणी ता. आमगाव, मोरेश्वर चैतराम मटाले (26) रा. मोहगाव ता. आमगाव व नरेश नारायण तरोणे (38) रा. आरटीओ ऑफिस जवळ गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

महेश दखने हे जमिन, भूखंड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. ते घटनेच्या वेळी त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच 35 एव्ही ने किसान चौक येथे गेले. यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी एका दुचाकी दुरूस्तीच्या दुकानापुढे ऊभी केली. एवढ्यातच धरून बसलेल्या आरोपी हल्लेखोरांनी महेश यांच्यावर लोखंडी हथोड्याने डोक्यावर वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोर घटनस्थळावरून पसार झाले. यानंतर महेश यांना डॉ. बहेकर यांच्या रुग्णालयात अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. रविवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कामिनी महेश दखणे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून विशेष पथकामार्फत आरोपींचा शोध घेण्यात आला. गोपनिय माहिती व तांत्रीक विश्लेषणावरून काल दुपारी देवा कापसे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर तिन आरोपींची नावे सांगीतली. आरोपींच्या शोधात पोलिस पाठवून त्यांना रविवारी रात्री 11.30 वाजता ताब्यात घेतले. याप्रकरणी भादंविच्या कलम 302, 307, 34 अन्वये गुन्हा नोंद करून आज 10 जून रोजी चारही आरोपींना न्यायालयात सादर केले असता 15 जूनपर्यंत न्यायालयाने चारही आरोपींना पोलिस कोठडी ठोठावली असल्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी रोहिणी बानकर यांनी शहर पोलिस ठाणे येथे आयोजित पत्र परिषदेत सांगीतले.

देवाने दिली महेशच्या हत्येची सुपारी

महेश व देवा हे जमिन खरेदी-विकक्रीचा व्यावसाय करीत होते. देवाचे महेशकडे 16 लाख होते. वारंवार मागणी करूनही महेशकडून पैसे परत मिळाले नसल्याने देवाने महेशच्या हत्येचा कट रचला. दरम्यान नरेश तरोणेच्या माध्यमातून आरोपी सुरेंद्र व मोरेश्वर यांना हत्येची सुपारी दिल्याचे सांगीतले जाते.