दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण

0
302

गडचिरोली,दि.२७ः गडचिरोली जिल्ह्यात माओवादी ळवळीत सक्रिय असलेल्या व शासनाच्या १६ लाख रुपयाच्या बक्षिस असलेल्या डिकेएसझेडसीएम (दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य) गिरीधर व डिव्हीसीएम संगिता या कंपनी क्र. 10 च्या दोन सेक्शन कमांडर असलेल्या माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसासमोर आत्मसमर्पण केले.

सविस्तर असे की, आजपर्यंत एकुण 666 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 27 जून 2024 रोजी दोन जहाल महिला माओवादी बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. 10, वय 28, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके, प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य, कंपनी क्र. 10, वय 29, रा. कटेझरी ता. धानोरा, जि. गडचिरोली यांनी आत्मसमर्पण केले.

बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे सन 2010 मध्ये गट्टा दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून अहेरी दलममध्ये बदली होऊन कार्यरत होता.श्व् सन 2016 मध्ये अहेरी दलममधून कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन कार्यरत.
श्व् सन 2021 मध्ये पीपीसीएम/एसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य//एरीया कमिटी सदस्य) म्हणून बढती व आजपर्यंत कार्यरत होता.त्याच्यावर कुण 21 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 10 चकमक, 01 जाळपोळ, 01 अपहरण व 9-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.तर शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके 2011 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2013 मध्ये टिपागड दलममधून कंपनी क्र. 04 येथे बदली.सन 2021 मध्ये कंपनी क्र. 04 मधून कंपनी 10 येथे बदली.सन 2023 मध्ये पीपीसीएम/एसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य/एरीया कमिटी सदस्य) या पदावर बढती व आजपर्यंत कार्यरत होती.तिच्यावर आजपर्यंत एकुण 08 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 06 चकमक, 02 इतर, इ. गुन्ह्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे हिचेवर 08 लाख रूपयाचे व शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.आत्मसमर्पणानंतर शासनाकडून आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे हिला एकुण 05 लाख हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईकेहिला एकुण 05 लाख हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर,अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र,निलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.