समृद्धी महामार्गावर कदावंची गावाजवळ भीषण अपघात,६ जणांचा मृत्यू

0
419

जालना-मृद्धी महामार्गावर दोन कार एकमेकींवर धडकल्याने भीषण अपघाताची घटना शुक्रवारी रात्री जालना येथे घडली. इर्टिका आणि स्विफ्ट डिझायर कार धडकल्याने अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गाडी नंबर MH 47 BP5478 अर्टिका मधील फैयाज मन्सुरी,फजल शकील मन्सुरी व अल्ताफ मंसूरी सर्व राहणार मुंबई व गाडी नंबर MH 12 MF1856 स्विफ्ट डिझायर मधील प्रदीप मिसाळ व इतर दोन असे तीन राहणार पिंपळगाव बुद्रुक तालुका देऊळगाव राजा यांचा अपघातात मृत्यू झालेला आहे.

इर्टिका कार नागपूरहून मुंबईला येत होती. महामार्गावरील जालना येथील कदावंची गावाजवळ गाडीत पेट्रोल भरल्यानंतर इर्टिका विरुद्ध दिशेने येत होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर वेगाने समोरून आल्याने दोन्ही कार एकमेकींवर धडकल्या. धडक इतकी जोरदार होती की कारमधील प्रवासी बाहेर रस्त्याच्या कडेला फेकले गेले.

अपघाताची माहिती मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर सातही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार महामार्गावरुन बाजूला हटवण्यात आले.