
अर्जुनी मोरगाव-ो तालुक्यातील सिरोली – महागाव जवळ दुचाकी आणि स्कूल बसमध्ये समरासमोर अपघात झाल्याची गंभीर घटना आज ता.१८ रोजी सकाळी १०.१५ दरम्यान घडली. अर्जुनी मोरगाव येथे वीज वितरण विभागात कार्यरत कर्मचारी हरी कोहरे (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणारी त्यांची पत्नी हिराबाई कोहरे वय ४० या सुद्धा गंभीर असल्याची घटना समोर आली आहे.
महागाव येथील रहिवासी असलेले हरी कोहरे विद्युत वितरण पारेषण १३२ अर्जुनी मोरगाव येथे शासकीय सेवेत कार्यरत होते. ते आपले रात्रपाळीतील सेवा पूर्ण करून राहते गांव महागाव हे मुख्यालया पासून जवळ असल्याने शेतात खरीप हंगामातील भात लागवडीकरीता मशागतीच्या कामाला मदत करण्यासाठी आपल्या पत्नीसह अर्जुनी मोरगाव वरून महागाव कडे जात असताना राधिका पेट्रोल पंप सिरोलीच्या जवळ स्कूल बस क्रमांक एम.एच. ३५ एजे ३६३४ व त्यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने गंभीर अपघात घडला.या धडकेत दुचाकी चालक हरी कोहरे यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी ही गंभीर रित्या जखमी झाल्या. जखमीवर ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे प्राथमीक उपचार करुन प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराससाठी ब्रम्हपुरीला हलविण्यात आले.