कोरपना (Chandrapur):- तालुक्यातील गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील गडचांदूर-भोयगाव मार्गावरील लखमापूर गावाजवळ भरधाव अर्टिगा कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार घडक दिली. या अपघातात कारमधील ५ जणा पैकी पैकी ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अंदाजे १ वाजताच्या च्या सुमारास घडली. सर्व जण जिवती तालुक्यातील असून सूरज नारायण गवाले वय २५ वर्ष रा.शेणगाव, सुनील माधव केजगीर वय २८ वर्ष रा. शेनगाव, आकाश गोविंदराव पंधरे वय २० वर्ष रा. चिखली पाठण, श्रेयश बाळाजी पाटील वय २२ वर्ष रा.टाटाकोहडा असे मृतकांचे नाव आहेत शेणगाव येथील १ जण गंभीर जखमी असल्याने त्याला अगोदर गडचांदूर, नंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेच्या रात्री हे सर्व जण अर्टिगा कार क्रं.एम एच ०४, एफ आर ४६८१ या कारने चंद्रपूरवरून गडचांदूरकडे येत असताना गडचांदूरपासून अवघ्या ६ ते ७ किमी अंतरावर असलेल्या लखमापूर-बाखर्डी गावाच्या मधात उभ्या ट्रक क्रं.एम एच १८, एन ६६५६ ला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. सदर घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले.गंभीर जखमी असल्याने एकाला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती आहे.
भीषण अपघात घडल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
या भीषण अपघाताच्या घटनेत ४ युवकांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र शोकांकळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहेत. या मार्गांवर अपघाताची शृंकला नेहमीच घडतं असताना याच मार्गावर पुन्हा भीषण अपघात घडल्याने लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.दरम्यान पुन्हा काही घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी रात्रीच अपघातग्रस्त कारला रस्त्याच्या बाजुला करून ट्रकला पोलीस स्टेशन येथे आणले आणि रस्ता खुला केला असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे