अग्रवाल ग्लोबल कंंपनीने कामाची गुणवत्ता सुधारावे अन्यथा जनआंदोलन उभारू-खा.पडोळे

0
378

गोंदिया:- जिल्ह्यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण पहाडी परिसरात उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु असून या पुलाची भिंत कोसळल्याने पुलाच्या बांधकामावर खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.खासदार पडोळे यांनी आज पुलाची पाहणी करीत संबधित अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांना धारेवर धरले.ब्रिजला लागलेले  आरीवॉलला (गट्टू) मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत.पंधरा-पंधरा दिवसांनी दोन्ही ब्रिजवर अपघात झालेले आहे.तर एक ब्रीज मध्यभागापासून कोसळल्याने चौकशी करण्यात येईल असेही यावेळी खासदार पडोळे यांनी सांगितले. ब्रीजच्या कामाची सुधारणा केली गेली नाही तर याच ठिकाणी मोठ्या संख्येने जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला.यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड,मधुसूदन दोनोडे,दामोदर नेवारे,रोशन बडोले,दिनेश हुकरे, किशोर शेंडे,विजय दुबे,दिलीप सोनवाणे,किरणताई हटवार सरपंच,सौ.पुष्पाताई खोटेले,धनवंता गभने,निनाताई राऊत,शंकर मेंढे,विरू गौर,संतोष लाढे यांच्यासह अग्रवाल ग्लोबल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.