
नागपूर, दि. 29 ऑगस्ट 2024 – वीज बिलापोटी थकबाकी असलेल्या ग्राहकाकडे थकीत बील वसुलीसाठी गेलेल्य महावितरण अभियंता आणि कर्मचा-यांना अश्लिल शिविगाळ करित जिवानिशि ठार मारण्याची धमकी देत मारहाण करण-या अहेफाज खान वल्द, रियाज खान आणि असलम खान या तिन आरोपींना नागपूर शहर तहसिल पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर घटना अशी की, मंग़ळवार (दि. 22 ऑगस्ट) रोजी महावितरणच्या ईतवारी उपविबागा अंतर्गत असलेल्या रिपब्लीक शाखा कार्यालयात कार्यरत सहायक अभियंता अशित रामटेके आणि त्यांचे सहकारी वरिष्ठ तंत्रज्ञ धनष्याम कुमरे, तंत्रज्ञ इरफान अली, वरिष्ठ तंत्रज्ञ हरीश नायक, प्रधान तंत्रज्ञ हिंदल लगावे, वरिष्ठ तंत्रज्ञ एस. एस. मैक्रतवार, तंत्रज्ञ श्रीमती किरण ठवकर आणि प्रधान तंत्रज्ञ सचिन कथलकर रिपब्लिक शाखे अंतर्गत परिसरातील थकीत विज बिल वसुली करीत होते. यावेळी खादीम मिर्झा गल्ली, खदान येथील खान असलम खान हमीद या ग्राहकाने मार्च महिन्यापासून वीज बिलाचा भरणा केला नसून त्याच्याकडे 5 हजार 990 रुपयांची थकबाकी असल्याने त्याच्याकडील वीज पुरवठा खंडित करण्यास गेले असता थकबाकीदार ग्राहकाचा मुलगा आरोपी अहेफाज खान याने अशित रामटेके आणि सहका-यांसोबत शिवीगाळ करून मारहान केली व तेथील लोकांसमोर अश्लील शिवीगाळ करित जीवानिशी ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी तेथे उपस्थित असलेले आरोपीचे नातेवाईक रियाज खान आणि असलम खान त्यांनी देखील अशित रामटेके यांना शिविगाळ करून धक्काबुक्की करित मारहाण करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी सरकारी कामात व्यत्यय आणुन सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना षिवीगाळ करून मारहान केली व मारहाण करण्याची धमकी दिली म्हणुन अहेफाज खान वल्द, रियाज खान आणि असलम खान वल्द हमीद खान या तिनही आरोपींविरोधात भारतिय न्याय संहिता कलम 132, 126(2), 296. 114(2), 352, 351(3). आंइ 3(5) अन्वये नागपूर शहर तहसिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आरोपींना तात्काळ अटक केली.