भरधाव कारने तिघांना उडविले

0
869

गोंदिया ः भरधाव कारने रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन ट्रक चालकांसह एका सायकलस्वारालाही धडक दिली. ही घटना सोमवारी (ता. २) सकाळी साडेदहाच्या सुमारास येथील पाॅलीटेक्नीक काॅलेजसमोर घडली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
एमएच ३५/ ए. जी. १५८८ क्रमांकाची कार गोरेगावकडून गोंदियाकडे येत होती. भरधाव असलेल्या कार चालकाचे स्टिअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने पाॅलीटेक्निक कॉलेजसमोर रस्त्याच्या कडेला बसलेल्या दोन ट्रकचालकासह एका सायकलस्वाराला कारने धडक दिली. हेमराज राऊत (वय ५४, रा. कारंजा) व कादीर शेख (वय ३८, रा. फुलचूर) अशी जखमी ट्रकचालकांची नावे आहे. सायकलचालकाचे नाव कळू शकले नाही. जखमींवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.