
शासनाने जाहिर केले होते एकुण 10 लाख रूपयांचे बक्षिस.
गडचिरोली,दि.१४ः- शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 674 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज 14 ऑक्टोंबर 2024 रोजी जहाल माओवादी वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु, दलम कमांडर (भामरागड दलम), वय 27, रा. पिडमिली ता. चिंतागुफा, जि. सुकमा (छ.ग.) व त्याची पत्नी रोशनी विज्या वाचामी, दलम सदस्य (भामरागड दलम), वय 24,रा. मल्लमपोड्डुर,ता. भामरागड, जि. गडचिरोली यानी गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित जहाल माओवादी वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु याच्यावर त्याचेवर आजपर्यंत एकुण 15 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 10-चकमक व 05-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.२०१५ मध्ये तो कोंटा एरीयामध्ये भरती झालेला होता.तर रोशनी विज्या वाचामी हिच्यावर आजपर्यंत एकुण 23 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 13-चकमक, इतर-10 गुन्ह्रांचा समावेश आहे.सन 2015 मध्ये राही दलममध्ये भरती झालेली होती.
महाराष्ट्र शासनाने वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु याचेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.रोशनी विज्या वाचामी हिचेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगु याला एकुण 5.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रोशनी विज्या वाचामी हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले माओवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. असे एकुण 11.5 लाख रुपयांचे बक्षिस शासनाकडुन जाहिर करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 27 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर,अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र,अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ,नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.