गोंदिया,दि.०५ः जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी येथे शेतातील खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून एका ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना 5 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.मृत युवकाचे नाव मिथून मेश्राम(वय ३५) असे आहे.सध्या जिल्ह्यात रबी हंगाम चालू असून शेतकरी भात पीक लावण्यासाठी त्यांच्या शेतात प्रचंड प्रमाणात पाणी देत आहेत.त्यातच सडक अर्जुनी तालुक्यातील खडकी येथील शेतशिवार परिसरात असलेल्या खड्यात पाणी साचून असते.त्या खड्यामध्ये मिरगी या रोगापासून पिडीत असलेला मिथून हा पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.मंगळवारपासून तो बेपत्ता असल्याने त्याचे कुटूंब शोध घेत होते.दरम्यान आज ५ फेबुवारीला दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याच मृतदेह शेताजवळील एका खड्यात तरंगताना आढळला.मृतक हा शौचासाठी गेला असतांना त्याला मिरगीचा झटका येऊन तो खड्ड्यात पडून बुडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.दरम्यान देवरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.