गोंदिया—बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी लागला. यात अनुउत्तीर्ण झाल्याने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्यांने स्वत:च्या जन्मदिनीच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.७) दुपारी २ वाजता आमगाव येथील बजरंग चौकात उघडकीस आली.
क्रिष्णा धर्मराज शिवणकर असे गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार क्रिष्णा शिवणकर हा आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. यावर्षी त्याने बारावीची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. यात क्रिष्णा शिवणकर हा अनुत्तीर्ण झाला. आपले सर्व मित्र उत्तीर्ण झाले मीच अनुउत्तीर्ण झालो यातून त्याला नैराश्य आले. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तो थोडा नाराज असल्याचे बाेलल्या जाते. क्रिष्णाने बुधवारी घरी कुणीही नसताना गळफास घेवून आत्महत्या केली. त्याचे आईवडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती आमगाव पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
जन्मदिनीच आवळला गळफास
क्रिणा शिवणकर या विद्यार्थ्याचा बुधवारी (दि.७) जन्मदिवस होता. क्रिष्णाचा जन्मदिवस असल्याने त्याचे कुटुंबीय सुध्दा आनंदात होते. तो बारावीत अनुत्तीर्ण झाला याची कुठलीही नाराजी न बाळगता पुन्हा चांगला अभ्यास कर आणि उत्तीर्ण हो असे प्रोत्साहान त्याच्या आई-वडीलांनी क्रिष्णाला दिले. मात्र क्रिष्णाच्या मनात काही वेगळेच होते. त्याने घरी कुणीही नसताना जन्मदिन गळफास घेवून आत्महत्या केली.
आई-वडील चालवितात छोटेस हाॅटेल
क्रिष्णाचे वडील धर्मराज शिवणकर यांची आमगाव येथे छोटेसे हॉटेल आहे. ते चहा व नाश्ता तयार करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावायचे. यात क्रिष्णा आणि त्याची आई सुध्दा धर्मराज यांना मदत करायचे. सुटीच्या दिवसात क्रिष्णा सुध्दा वडीलांना मदत करायचा. मात्र क्रिष्णाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबीयांवर मोठा धक्का बसला.