गोंदिया :-जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंभोरा गावात संशयावरुन पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करीत ठार केल्याची घटना ८ मे च्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.घटनेनंतर आरोपी सुनील मदन पटले(वय ३५)यांने स्वतःच पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केले.या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील पटलेचा पत्नीच्या चारित्रावर संशय होता.याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे.८ मे रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झाले, ज्यात सुनीलने रागाच्या भरात कुऱ्हाडने पत्नीवर हल्ला केला.या हल्ल्यात ती जागीच मरण पावली.