
मृतकाची अद्याप ओळख पटली नाही
चित्रा कापसे/ तिरोडा- स्थानीय अदानी प्रकल्पपातील गेट नंबर १ च्या पुढे १९ मेच्या रात्री एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये त्या अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.त्या मृतदेहावर स्थानिक तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून तिरोडा पोलिसांनी अंत्यसंस्कार केले.
याविषयी सविस्तर वृत्त असे की १९ मे रोजी रात्री १ वाजेच्या दरम्यान अदानी प्रकल्पाच्या गेट नंबर १ पुढे एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक देऊन जख्मी केले, अशी माहिती रात्री गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांना मिळाली.ते आपले सहकारी सहाय्यक फौजदार दिनेश पटले, शिपाई नीलपत्रेवार यांच्यासह घटनास्थळी पोहोचले असता घटनास्थळी एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत पावल्याचे दिसून आले.मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला, शवविच्छेदनानंतर अनोळखी मृतदेह अंतिम संस्कारासाठी कोणतीही व्यक्ती न आल्याने तिरोडा पोलीस स्टेशनचे हवालदार योगेश कुळमते यांनी तिरोडा नगरपरिषदेच्या साहाय्याने मोठा नाला स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.घटनेविषयीचा संपूर्ण तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका करीत आहेत.