
गोंदिया : रावणावाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरपार येथील विद्युत खांबावर लावण्यात आलेले इलेक्ट्रिक कंडक्टर व अॅल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीच्या सदस्यांना गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. ही कारवाई २८ मे रोजी करण्यात आली. प्रमोद परसराम मेहर (३४) रा. कालीमाटी, रामा दासीराम मेश्राम (२३), राजू भागू मेश्राम (३१), अंकुश जगू मेश्राम (२५) व महेंद्र लखन कांबळे (१९) सर्व रा. बोदा, ता. आमगाव, जि. गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सुमितसिंग प्रितपालसिंग बग्गा (३७) रा. गणेशनगर गोंदिया यांनी पोलिस ठाणे रावणवाडी येथे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यात गोंडीटोला ते हर्षवर्धन चौक मुरपार दरम्यान ६ इलेक्ट्रिक खांबावर लावण्यात आलेले इलेक्ट्रिक कंडक्टर तार किंमत १ लाख ४० हजार रुपयांचे १९ एप्रिल ते २० एप्रिलच्या चोरट्यानी चोरून नेले होते.या प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात पोलिस पथक सहायक पोलिस निरीक्षक धीरज राजूरकर, पोलिस हवालदार विठ्ठल ठाकरे, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, हंसराज भंडारकर, घनश्याम कुंभलवार, राम खंदारे यांनी केली आहे.गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींजवळून अॅल्युमिनियम कंडक्टर ताराचे तीन मोठे बंडल किंमत ४ लाख ५० हजार रुपये व इलेक्ट्रिक खांबास लावण्यात येणारे अर्थिग वायर, कब्जे, चॅनेल एक्सटेन्शन वायर अंदाजे किंमत २५ हजार असा एकूण किंमत ४ लाख ७५ रुपयांचा माल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आला.