34.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जिल्हा बँक निवडणुकीसाठी ७९ जणांचे अर्ज दाखल

जिल्हा बँक निवडणुकीसाठी ७९ जणांचे अर्ज दाखल

0
214

blank

गोंदिया-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकरिता २६ मेपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. गुरुवारपर्यंत (दि.२९) जिल्ह्यातील विविध मतदारसंघांतून ७९ जणांनी नामांकन अर्ज दाखल केले. त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १५ जणांचा समावेश आहे.
तब्बल तेरा वर्षांनंतर होत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत तालुक्यातील सहकार क्षेत्रात चांगलीच रंगत आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात विविध मतदारसंघांतील १०८ बँक प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गुरुवारपर्यंत तालुक्यातून १५ जणांनी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी नामांकन सादर केले.
उमेदवारी अर्ज सादर करणाऱ्यांमध्ये प्रकाश शहारे यांनी अनु.जाती जमाती गट, बन्शीधर लंजे इतर मागासवर्ग गट, विजयकुमार राठोड यांनी मजूर कामगार सहकारी संस्था गट, पद्मा राठोड- महिला राखीव प्रतिनिधी, मोरेश्वर कोरे यांनी संस्था गट, भोजराम रहेले यांनी इतर मागासवर्ग गट, केवळराम पुस्तोळे यांनी संस्था गट, प्रमोद लांजेवार यांनी संस्था गट तसेच इतर मागास प्रवर्ग, रजनी राकेश लंजे यांनी संस्था गट व महिला गट, रघुनाथ मेश्राम यांनी मत्स्यपालन संस्था गट, विजयाबाई दयाराम कापगते यांनी संस्था गट व महिला राखीव, ललीतकुमार बाळबुद्धे यांनी इतर मागास प्रवर्ग गट, आजपर्यंत तालुक्यातील १५ जणांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

blank