39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता धनादेश अनादर प्रकरणात आरोपीला १ वर्षाची शिक्षा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीला १ वर्षाची शिक्षा

0
1198

blank

गोंदिया,दि.०३ः श्रीराम सीटी फायनांस कंपनीकडून कर्जाकरीता घेतलेली रक्कम व्याजासह परत करतांना दिलेला धनादेश न वटल्याने गैरअर्जदार असलेल्या शैलेंद्र खोब्रागडे यास जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश अभिजित कुलकर्णी यांनी १ वर्ष दंडाच्या शिक्षेसोबतच ९ टक्के दराने रक्कम परत करण्याची शिक्षा २९ मे २०२५ रोजी सुनावली.

येथील श्रीराम सीटी युनीयन फायनांस कंपनी शाखा गोंदियाकडून गणेशनगर निवासी शैलेंद्र दिलीप खोब्रागडे यांनी श्रीराम सिटी युनियन बँकेकडून २ लाख रुपयाचे कर्ज घेतले होते.त्या कर्जाची रक्कम व्याजासह २ लाख ४६ हजार ८६१ रुपये धनादेशाच्या माध्यमातून जमा केले.मात्र शैलेंद्र खोब्रागडे यांनी दिलेला धनादेश बँकेत न वटल्याने श्रीराम सीटी फायनांस कंपनीच्यावतीने न्यायालयात धाव घेण्यात आली.फायनांस कंपनीच्यावतीने एड.आर.ओ.कटरे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडत गैरअर्जदाराने बँकेत पुरेशी रक्कम नसताना गोंदिया येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेचा असलेला धनादेश फायनांस कंपनीला व्याजासहीत रकमेचा २७ सप्टेंबर २०१८ रोजी दिला होता.तो धनादेश फायनांस कंपनीने ११ डिसेंबर २०१८ रोजी एक्सीस बँकेच्या खात्यात जमा केले असता सदर धनादेश असलेल्या बँकेच्या खात्यात रक्कम समाधानकारक नसल्याने धनादेश परत आला.त्यामुळे कंपनीच्यावतीने सदर गैरअर्जदारास नोटीस देण्यात आली.त्यानंतर सदर धनादेश न वटल्याप्रकरणी गोंदिया न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले.या प्रकरणात अर्जदाराच्यावतीने एड.आर.ओ.कटरे यांनी गोंदिया सत्र न्यायालयाचे न्यायाधिश अभिजित कुलकर्णी यांच्यासमोर बाजू मांडत गैरअर्जदाराने फसवणूक केल्याचे पुराव्यासह स्पष्ट केल्याने न्यायाधिश अभिजित कुलकर्णी यांनी गैरअर्जदार शैलेंद्र खोब्रागडे यास सदर प्रकरणात दोषी ठरवित १ वर्षाची शिक्षा देत ९टक्के दराने कर्जाची रक्कम परत करण्याचा निर्णय दिला.

blank