
अमरावती,दि.११ः शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या दुय्यम निबंधक क्रमांक.२मधील महिला दुय्यम निबंधक व दलालास ५ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे प्लॉट खरेदी विकीचा व्यवसाय करीत असून त्यांनी सन २०२१ मध्ये अमरावती येथे त्यांचे व त्यांची पत्नी यांचे नांवे एक फ्लॅट खरेदी केला होता. सदर फ्लॅटचे गृहकर्ज व उसनवार पैसे देणेकरीता तकारदार यांनी सदरचा फ्लॅट त्यांचे बहिणीला विकण्याचे ठरविला. त्याकरीता ते सहदुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक २ अमरावती येथे सदरच्या फ्लॅटचे विकीकरीता गेले असता तेथे असलेला दलाल रायबोले यांना भेटले असता त्याने तक्रारदार यांचे फ्लॅटचे कागदपत्रे पाहुन म्हटले की, “सदर पलॅटचा ७/१२ तुमच्या नांवे नसल्यामुळे सदर फ्लॅटची विकी होवु शकणार नाही. “मी सह दुय्यम निबंधक श्रीमती बेबी मेश्राम मॅडम यांना भेटुन मी तुमचे काम करून देवु शकतो”.दुय्यम निबंधक यांचा दलाल म्हणून काम करणारा खाजगी व्यक्ती रायबोले याने तक्रारदार यांना त्यांचे फ्लॅटची विकी करून देण्यासाठी ५,००० रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तकारदार यांनी दि. १०.०६. २०२५ रोजी लेखी तकार दिली.
तकारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान खाजगी व्यक्ती रायबोले याने तक्रारदार यांना ५००० रुपये लाचेची मागणी करुन स्विकारण्याची तयारी दर्शविली व दलाली करणाऱ्या रायबोले याने तकारदार यांची सह दुय्यम निबंधक श्रीमती मेश्राम यांची भेट करून दिली असता, त्यावेळी तक्रारदार यांनी श्रीमती मेश्राम यांना उददेशून म्हटले की,”पाच हजार राहीले मॅडम” त्यावेळी श्रीमती मेश्राम यांनी खाजगी व्यक्ती रायबोले यास उददेशून म्हटले की, “यांचे काय आहे ते तुम्ही पाहून घ्या व निपटून घ्या” असे म्हणून रायबोले याला सह दुय्यम निबंधक श्रीमती मेश्राम यांनी लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.सापळा कारवाई दरम्यान खाजगी इसम किशोर जयरामजी रायबोले, वय-४९ वर्ष, व्यवसाय खाजगी खरेदी विक्रीचे काम,दलाली करणे,रा.सिध्दार्थ नगर,सिव्हील लाईन, अमरावती याने तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष ५००० रुपये स्विकारले.सदरहू सापळा कारवाई दुय्यम निबंधक कार्यालय,क्रमांक २, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अमरावती येथे दिनांक १०/६/२०२५ रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या दरम्यान करण्यात आली. या वरून आलोसे श्रीमती.बेबी कर्णजी मेश्राम,वय ५७ वर्ष,पद- सह दुय्यम निबंधक (वर्ग-०२) नेमणुक सह दुय्यम निबंधक कार्यालय, अमरावती व आरोपी किशोर जयरामजी रायबोले, वय ४९ वर्ष, व्यवसाय खाजगी खरेदी विक्री व दलाली काम करणे,रा.सिध्दार्थ नगर,सिव्हील लाईन, अमरावती,या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असुन दोन्ही आरोपी विरुद्ध पो.स्टे.गाडगेनगर, अमरावती येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.