गांजासह एक लाखाचा मुद्देमाल जप्त

0
62

गोंदिया : जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने ११ जून रोजी रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील वसंतनगर भागात गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींवर धाड टाकून एक लाख ४४० रुपये किमतीचा माल जप्त केला.
या प्रकरणी मुकेश सुदर्शन भारती (४५, रा. मस्कऱ्या चौक, देवरी), राकेश यादोराव देवरे (४५, रा. संजयनगर, देवरी) व गोविंद अग्रवाल (रा. बसंतनगर, गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ९९७ग्रॅम ओलसर गांजा किंमत १९ हजार ९४० रुपये, स्कूल बॅग ५०० रुपये व मोटारसायकल ८० हजार रुपये असा एकूण एक लाख ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांच्या तक्रारीवरून आरोपींवर एनडीपीएस कायद्याचे कलम ८ (क), २०,२९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सहायक पोलिस निरीक्षक राजूरकर, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलिस उपनिरीक्षक शरद सैदाने, अंमलदार राजू मिश्रा, महेश मेहर, भुवनलाल देशमुख, दीक्षितकुमार दमाहे, दुर्गेश तिवारी, संजय चव्हाण, सुबोध बिसेन, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, संतोष केदार, छगन विठ्ठले, कुमुद येरणे, स्मिता तोंडरे आदींनी केली आहे