40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता अवैध रेती उत्खनन चोरी प्रकरणात १ कोटी १० लाख ६९ हजाराचा मुद्देमाल...

अवैध रेती उत्खनन चोरी प्रकरणात १ कोटी १० लाख ६९ हजाराचा मुद्देमाल जप्त

0
439

blank

कारवाईत ०५ टिप्पर चालक व मालकांवर कारवाई

गोंदिया,दि.१७ः- स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे १७/०६/२०२५ च्या पहाटे 0५.00 वाजेच्या सुमारास पो. ठाणे दवनिवाडा हद्दीत साईटोला गावाजवळील वैनगंगा नदीच्या पात्रामधुन अवैध रेती (वाळु) उत्खनन करणा-या तस्करांवर छापा घालून ०५ टिपर ताब्यात घेण्यात आले.तसेच चालक व टिप्पर मालंकावर कारवाई करुन ५ टिपर व २३ ब्रास रेती असा एकुण किमती १,१०,६९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पो स्टे दवनिवाडा येथे नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक सपोनि धीरज राजूरकर, अंमलदार संजय चव्हाण, भुवनलाल देशमुख, सोमेन्द्रसिंग तुरकर , छगन विठ्ठले चापोशी राम खंदारे यांनी कारवाई केलेली आहे.

blank