
देवरी,दि.०२: तालुक्यात मोटार सायकली चोरण्याचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. अखेर गेल्या ३० जून रोजी एक मोटार सायकल चोर देवरी पोलिसांच्या जाळ्यात अखेर अडकलाच. या चोरट्याकडून पोलिसांनी अंदाजे एक लाख किमतीच्या ३ मोटार सायकली जप्त करून त्या चोराल्या बेड्या ठोकल्या.
गेल्या २१ मे रोजी मौजा सुरतोली येथून मोटार सायकल चोरीचा गुन्हा देवरी पोलिसांत दर्ज करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक गोरख भामरे आणि देवरीचे उपविभागीय पोलिस अधीक्षक विवेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली देवरी पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरवात केली. पोलिसांच्या या कार्यवाहीला गेल्या ३० तारखेस यश प्राप्त होत अखरे आरोपी नामे सौरभ भाष्कर भुते, (वय २१ वर्षे )रा. मुल्ला, ता. देवरी, जिल्हा गोंदिया यास आपल्या जाळ्यात घेतले. आरोपी कडून पोलिसांनी अदाजे १ लाख किमतीच्या हिरो कंपनीची एचएफ – डिलक्स एमपी ५०-एम एस ६९६७,होंडा कंपनीची ड्रीम युगा सीजी-०८- एस १५९८ आणि हिरो कंपनीची एचएफ – डिलक्स एमएच -४०-बीडब्ल्यू ११८९ अशा तीन मोटार सायकली जप्त केल्या.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविण डांगे देवरी यांचे नेतृत्वात पोलिस हवालदार हेमंत मस्के/२३२ हे करीत असुन सदर गुन्हयातील आरोपीला पो. हवा हेमंत मस्के/२३२ व पो.शि. विनोद बिसेन १२०३ यांनी स ताब्यात घेतला आहे.