35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता विना परवाना रासायनिक खत घेऊन जाणाऱ्या परप्रांतीय शेतकऱ्यांवर कृषी विभागाची कारवाई, तीन...

विना परवाना रासायनिक खत घेऊन जाणाऱ्या परप्रांतीय शेतकऱ्यांवर कृषी विभागाची कारवाई, तीन मालवाहक जप्त

0
2324

blank

गोंदिया दि.१३ : विना परवाना परप्रांतीय शेतकऱ्यांना रासायनिक खत विक्री केल्यानंतर ते घेऊन जातान कृषी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी सायंकाळी कारवाई करीत तीन मालवाहक जप्त करीत गाडी चालकांवर आमगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.blank
आमगाव शहराला लागूनच छत्तीसगड व मध्य प्रदेशची सीमा आहे.या परिसरातील शेतीवर खरीप हंगामाला सुरूवात झाली की पिकांना उभारी घेण्यासाठी विविध रायायनिक घटकांचा वापर करतात. खतांची गरज असल्यामुळे शेतकरी आमगावातील कृषी केंद्रात रासायनिक खते खरेदीसाठी गर्दी करीत आहेत़. परंतु काही कृषी केंद्र लालसेपोटी परप्रांतीय शेतकऱ्यांना विनापरवाना खत विक्री करीत असल्याचे आढळून आलेत. १२ जुलै शनिवारला सायंकाळी पाच वाजे दरम्यान परप्रांतीय शेतकरी रासायनिक खते पर राज्यात घेऊन जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करून तीन वाहन जप्ती केली.यात ४५ पोती रासायनिक खत एकूण किंमत ४५,००० हजार रुपये किमतीचे जप्त केली. वाहन क्रं एम एच ३५ ए जे ४३६२, एम एच ३५ ए जे ३५२९ एम एच ३१ डी एस २५९७ वाहन चालक शैलेंद्र दमाहे रा.घंसा , शुभम येडे राहणार पाथरगाव, विनोद कोघुटे राहणार बिंजली या गाडी चालकांवर रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ (४) (ब ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

काही रासायनिक खत विक्री करणाऱ्या दुकानदारांची नावे समोर आली असून तपास सुरू आहे तपासानंतर पुरावा आढळल्यास त्या दुकानदारावर कारवाई करण्यात येईल.
संतोष सातदिवे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कृषी विभाग गोंदिया.

blank