25.2 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home गुन्हेवार्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे 5 कोटींच्या भूखंडाची परस्पर विक्री, ठाकरे सेनेच्या नेत्यासह तिघांना...

बनावट कागदपत्रांच्या आधारे 5 कोटींच्या भूखंडाची परस्पर विक्री, ठाकरे सेनेच्या नेत्यासह तिघांना अटक

0
30
अकोला-अकोल्यातील मलकापूर भागात बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल 5 कोटी रुपयांच्या भूखंडाची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण याला मुख्य सूत्रधार म्हणून अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आस्तिक चव्हाण हा शिवसेना (उबाठा) गटाच्या युवा सेनेचा अकोला जिल्हाप्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रसार माध्यमांतील वृत्तसेवा या प्रकरणात आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण (युवा सेना जिल्हाप्रमुख), राहुल अशोकराव जाधव, आणि प्रियांका लक्ष्मण पाटील उर्फ प्रियांका नागेश चव्हाण या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेली प्रियांका ही आस्तिक चव्हाणची वहिनी आहे.
मलकापूर परिसरातील सव्र्हे नं. 8 मधील प्लाॅट नं. 21 (क्षेत्रफळ 5,075 चै. फूट) हा भूखंड अकोल्यातील गाडेकुळ काॅलनी येथे राहणार्या 74 वर्षीय वयोवृद्ध महिला शांता प्रकाश बाहेकर यांच्या मालकीचा आहे. मोक्याचा जागी असणार्या या भूखंडाची बाजारभावानुसार किंमत 5 कोटी रुपये आहे. आरोपींनी संगनमत करून एका वेगळ्याच महिलेला शांता बाहेकर म्हणून उभे केले. त्यानंतर उल्हासनगर आणि अकोला येथे बनावट कुलमुखत्यारपत्र व खोटे खरेदीखत तयार करून या 5 कोटींच्या भूखंडाची परस्पर विक्री केली.
या प्रकरणी शांता बाहेकर यांच्या फिर्यादीवरून अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या दोन तासांत तिन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे बनावट कुलमुखत्यारपत्र आणि खरेदीखत नक्की कुठे आणि कोणाच्या मदतीने तयार करण्यात आलं? हा बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी सरकारी महसूल किंवा दुय्यम निबंधक कार्यालयातील कोणत्या कर्मचार्यांनी मदत केली, तसेच या टोळीत आणखी किती जण सहभागी आहेत, याचा सखोल तपास सध्या अकोला पोलीस करत आहेत.