नागपूर,दि.03– नागपुरातील एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथील फुटाळा तलावात पती, पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. या कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळी ही घटना समोर आली.नागपूर पोलिसांनी तिन्ही मृतांची ओळख पटवली असून मृत निलेश शिंदे (35) पत्नी रुपाली शिंदे (32) आणि 3 वर्षांची मुलगी नाहली शिंदे यांच्यासोबत शहरातील तेलंगखेडी हनुमानमंदिर परिसरात राहात होता.