23.7 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home गुन्हेवार्ता राईसमिल अडकून महिलेचा मृत्यू

राईसमिल अडकून महिलेचा मृत्यू

0
22

गडचिरोली,दि.17ः- गावात असलेल्या राईसमिलवर धान भरडाईसाठी गेलेल्या महिलेचा राईसमिलमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना काल १५ फेब्रुवारी सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली येथे घडली. गौरता दुर्गम (५0) रा. कोटापल्ली असे मृतक महिलेचे नाव आहे.
गौरता दुर्गेम ही काल दुपारी अडीच वाजता गावात असलेल्या राईसमिलमध्ये धान भरडाईसाठी गेली असता तिचा साडीचा पदर मिलला अडकून पोटाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती असरअल्ली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर महिलेचा मृत्यू मील मालक सम्मी रेड्डी याने निष्काळजीपणाने चालविल्याने झाला असे तपासात आढळून आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मिल मालकाविरुद्ध असरअल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.