Home गुन्हेवार्ता निराधार तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

निराधार तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

0

नागपूर,दि.१९ : मित्रासोबत आॅटोतून जात असलेल्या एका निराधार तरुणीचे (वय १९) चाकूच्या धाकावर अपहरण करून एका तडीपार गुंडासह तिघांनी तिच्यावर रात्रभर सामूहिक बलात्कार केला. असहाय पीडित तरुणी आधी भरोसा सेल आणि नंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी लगेच धावपळ करून तीनही आरोपींना ताब्यात घेतले. शनिवारी रात्री ९ वाजता सुरू झालेला हा संतापजनक घटनाक्रम रविवारी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर चर्चेला आला.
अखिलेश ऊर्फ अख्खि प्रकाश वांद्रे (वय २२, रा. जयभीमनगर, अजनी), रितेश भीमराव गवई (वय १९, रा. त्रिशरण चौक, अजनी) आणि शुभम ऊर्फ निंबू गजानन निंबाळकर (वय १९, रा. एसआरपीएफ कॅम्पजवळ, हिंगणा, एमआयडीसी) अशी आरोपींची नावे आहेत.
त्यातील आरोपी अखिलेश हा तडीपार गुंड असून, तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, अजनीत त्याची प्रचंड दहशत आहे. पीडित तरुणीला वडील नाही. तिची आई आजारी असून, अजनीतील एका झोपडीत ती राहते. ती कॅटरर्सकडे काम करते. शनिवारी रात्री ७ च्या सुमारास पीडित तरुणी, तिचा आॅटोचालक मित्र राकेशसोबत सीताबर्डीत आली. त्यांच्यासोबत प्रज्वल नामक अन्य एक मुलगा होता. ९ वाजेपर्यंत आॅटोत फिरल्यानंतर झाशी राणी चौकातून ते अजनीला परत जाण्यासाठी निघाले. महाबँक चौकाजवळ त्यांच्या आॅटोसमोर आरोपी अखिलेशने सिनेस्टाईल त्याची मोटरसायकल आडवी केली. अखिलेशसोबत त्याचा साथीदार आरोपी रितेश गवईसुद्धा होता. मोटरसायकलवरून उतरून रितेश आॅटोत येऊन बसला. त्यानंतर भलामोठा चाकू दाखवून अखिलेशने आॅटोचालक राकेशला गप्प राहण्यास भाग पाडले. आरोपी अखिलेश याने आॅटोतील तरुणीला ‘माझी गर्लफ्रेन्ड कुठे आहे, अशी विचारणा केली. तिने माहीत नाही म्हणताच तिला आरोपीने अश्लील शिव्या दिल्या. माहिती सांग नाही तर तुझ्यावर येथेच बलात्कार करून जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. चाकू पाहून घाबरलेल्या तरुणीने अखिलेशला तुझी मैत्रीण यवतमाळला गेली, असे सांगितले. तू आधी का खोटी बोलली, असे विचारत अखिलेशने तिला जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर ओढले’. त्यानंतर आरोपी अखिलेश तिला घेऊन जयताळा परिसरातील ससाने लेआऊटमधील एका निर्माणाधीन इमारतीत गेला. मागे राकेश (तरुणीचा मित्र, आॅटोचालक), प्रज्वल आणि या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपी रितेश ऊर्फ काल्या गवई आॅटोत बसून होता. आॅटो प्रतापनगरात थांबवण्यात आला. या इमारतीत आरोपींनी आधीच निंबू नामक साथीदाराला बोलवून ठेवले होते. तेथे तरुणीला निंबूच्या हवाली केल्यानंतर आरोपी अखिलेश पुन्हा प्रतापनगरात आला. तेथे त्याने आॅटोतून रितेश आणि प्रज्वलला सोबत घेतले. आॅटोचालक राकेशला धमकी देऊन पळवून लावले. परत इमारतीत आल्यानंतर आरोपी अखिलेश, निंबू आणि रितेशने दारू पिली. प्रज्वलला त्यांनी धाक दाखवून दाराजवळ बसविले. त्यानंतर या तिघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

Exit mobile version