27.1 C
Gondiā
Monday, August 31, 2026
Home गुन्हेवार्ता दोन विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ;प्राध्यापिकेला अटक

दोन विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ;प्राध्यापिकेला अटक

0
30

अमरावती, दि.२९: –जिल्ह्यातील नयनरम्य असलेल्या चिखलदरा येथील एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेने अकराव्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातच लैंगिक छळ केल्याच्या घटनेने शहरातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्राध्यापिका भाग्यश्री कुंजीलाल चंदनकर (४२) रा. चिखलदरा नामक प्राध्यापिकेला अटक करण्यात आली.सदर महाविद्यालयात  ७ डिसेंबर ते ९ मार्च या कालावधीत प्रा. चंदनकर यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ करणे सुरू केले होते. सततच्या त्रासाने दोन्ही विद्यार्थी त्रस्त होते.महाविद्यालयातच प्राध्यापिकेकडून होणाऱ्या या त्रासामुळे त्रस्त झालेल्या दोन्ही पिडीत विद्यार्थ्यांनी याबाबत प्राचार्य अनिल प्रांजळे यांच्याकडे तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता विद्यार्थ्यांकडून तक्रार प्राप्त होताच प्राचार्यांनी चिखलदरा पोलिसात प्रा. चंदनकर यांच्याविरुद्ध दोन विद्यार्थ्यांच्या छळ प्रकरणाबाबत मंगळवारी (दि. २७) तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे प्रा. चंदनकर हिच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. बुधवारी (दि. २८) या प्रकरणी प्रा. चंदनकर हिला अटक करण्यात आली.पुढील तपास चिखलदारा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक के. बी. ठाकरे करीत आहेत.