अर्जुनी-मोर,दि.05ः-अर्जुनी-मोर पासून पाच किलोमीटर अंतरावर कोहमारा राज्य महामार्गावर बाराभाटी येथील राईस मिल जवळ मोबाईल अम्बुलंस गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील ताबा सुटून गाडीला अपघात घडल्याची घटना 4 मार्च रोजी रात्री घडली. अम्बुलंस रस्त्याच्याकडेला पलटल्याने गाडीतील मोबाईल मेडीकल युनिटचे डॉ.आनंद कुकडे व त्यांचे दोन सहकारी होते.यातिघांपैकी नवेगाव बांध येथील येथील रहिवासी सुभाष कुंभरे हे गाडीखाली आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाले.तर अन्य दोघांना अर्जुनी-मोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.